वाघूर धरणातून पाण्याच्या विसर्गात होणार वाढ; नागरीकांना सतर्कतेचा इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (मंगळवार) संध्याकाळी ५.३० वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा ३४० क्युसेक व वाढीव ३४० क्युसेक्स असा एकुण ६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.