मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या आहेत. मात्र अशातही येस बँक घोटाळ्यातील बागवान कुटुंबिय लोणावळ्याहून पाचगणीला पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली. येस बँक घोटाळ्यातील वागवान कुटुंबाला लोणावळ्याहून पाचगणीला जाण्यासाठी गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते.
वागवान कुटुंबियांना सदर परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल रात्री सांगितले होते. त्यानुसार आता पत्र देणारे गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. यामुळे वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे प्रधान सचिवांच्या अंगलटी आले आहे.