वाकोद, ता. जामनेर –
वाकोदसह पंचक्रोशीत शेतकरी वर्गाच्या हिता साठी एका नवीन संकल्पनेतून स्मार्ट फार्मर सोलुशन्सच्या कृषी सेवेचा नुकताच मोठ्या थाटाने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाज शिरोमणी, संघपती श्री. दलुभाऊ जैन, पहुर पो. स्टे. चे स.पो.नि. डी. के. शिरसाठ, पी. एस. आय. किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजुभाऊ बोहरा, माजी सरपंच प्रदीपभाऊ लोढा, जि.प. सदस्य अमीत देशमुख, सरपंच शेख अलीम, सरपंच रामेश्वरम पाटील, माजी. जि.प. सदस्य राजधर पांढरे, उत्तमचंद लोढा, सुभाषचंद लोढा, विजय सोमानी, नरेंद्र सोमानी, अभय लोढा, कन्हैय्या सोमानी, अमोल लोढा, अजय लोढा, अर्पण लोढा, नितीन कुलकर्णी, वैभव लोढा, अक्षय महामुने यांच्या सह असंख्य मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. महाजन यांना या संकल्पनेची माहीती देण्यात आली स्मार्ट फार्मर या संकल्पनेतून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असून अनेक मोठमोठ्या कंपन्याचा माल आता ग्रामीण भागात देखील शेतकरी वर्गाला सहज उपलब्ध होणार असल्याने पैश्यासह, वेळेची बचत होणार आहे तसेच योग्य मार्गदर्शना साठी अनुभवी व प्रशिक्षित कृषी तज्ञ देखील शेतकरी वर्गाला या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शेतकरी बांधवाना प्रगतीप्रथा कड़े नेणारी आपल्या शेतीला अधिकाधिक लाभदायी बनविणारे नव-नवे उत्पादन तंत्रज्ञानाशी जोडणारी एक कृषी चळवळ म्हणजेच स्मार्ट फार्मर सोलुशन्स हा शेतकरी हीताचा हेतु असून या कृषी सेवेच्या माध्यमातून नवीन बी- बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते या सह अन्य उत्पादने एका छता खाली मिळणार आहे या सेवे बद्दल शेतकरी वर्गा कडून कौतुक केले जात आहे.या कार्यक्रम वेळी वाकोदसह परिसरातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुणोत आणि पुनम लोढा यांनी केले तर आभार पवन बाहेती, शुभम सुराणा यांनी मानले.
फोटो : राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरिशभाऊ महाजन, समाज शिरोमनी दलुभाऊ जैन वाकोद स्मार्ट फार्मर सोलुशन्सचे संचालक अर्पण लोढा, विजय सोमाणी, अभय लोढा, वैभव लोढा आदी.