वाकोद येथील युवकाचा पहूर येथे आढळला मृत्यू

0

पहूर.ता जामनेर | प्रतिनिधी 

येथून जवळ असलेल्या वाकोद येथील तेवीस वर्षीय युवकाचा पहूर येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या वाकोद ता.जामनेर येथील रविंद्र नामदेव महाले या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह एकुलती रोडलगत पहूर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या बाजुला आढळून आला. मृत्यू चे कारण समजू न शकल्याने त्याचा मृतदेह जळगांव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला आहे. पहूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन वाघ यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे पी आय राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली शशिकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.