वाकडी ता. जामनेर वार्ताहर
येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेच्या चिमुकल्यांनी होऊ घातलेल्या 21 ऑक्टोंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या मुख्याध्यापक उपशिक्षक यांनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून मतदानासाठी गावांमधून घोषणा देत नागरिकांना जागृत करण्याचे काम या प्रभात फेरी मधून करण्यात आले.
नागरिकांना जागृत करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या यामध्ये जागृत नागरिक होऊया अभिमानाने मतदान करूया नवे वारे नवी दिशा मतदानाने ठरेल उद्याची आशा सोडा सारे काम धाम चला करूया मतदान देश प्रगतीची पायरी चढेल आपल्या मतदानाने बदल घडेल याप्रमाणे घोषणा देत प्रभात फेरी ही ही ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आली असता यावेळी याठिकाणी सुज्ञ नागरिक महिला शिक्षण समिती अध्यक्ष बिसन सिंग ठाकूर नितीन आंधळे दीपक गोळे भगवान डिके अमोल धुमाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मतदान जनजागृती चा कार्यक्रम याठिकाणी घेण्यात आला.
तसेच जि प मराठी शाळेचे केंद्रप्रमुख रामभाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे उपशिक्षक कैलास सोनवणे यांनी पथनाट्य संपल्यानंतर येथे जमलेल्या बहुसंख्य नागरिकांना मतदान आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन व मतदानाविषयी जनजागृती केली यावेळी प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी जि प मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना इंगळे उपशिक्षक चिंतामण वाघ पुनम डकले वंदना पोळ सुनिता मोरे स्वाती पाटील नीता पाटील यांनी परिश्रम घेतले.