वांजोळा चौकात अंडरपासला मंजुरी ; खा.रक्षा खडसेंच्या प्रयत्नांना यश

0

भुसावळ (प्रतिनिधी )– शहरालगत एनएच -6 वरील वांजोला चौकात अंडर पासची मंजुरी मिळाली असून नागरीकांनी खासदार रक्षा खडसे यांचे आभार मानले आहेत. वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवाय ग्रामस्थ व वांजोळा रोडवरील नागरीकांना ही नववर्षाची भेट मानली जात आहे.

अंडरपासमुळे अपघातांना बसणार आळा

चिखली ते तरसोद या मार्गावर नॅशनल हायवेचे काम प्रगतीपथावर आहे, वांजोळा चौफुलीवरून वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेलवाय ही गावे जोडलेली आहेत तसेच भुसावळ शहरातील सुमारे 6 हजाराच्या आसपास वस्ती पसरलेली आहे. सर्व गावकरी व शहरातील लोक वांजोळा रोडवरुन दररोज एन.एच.6 ओलांडून शहरात येतात. कारण एनएच-6 भुसावळ शहराचा भाग आहे यापूर्वी वांजोळा चौकात बर्‍याच दुर्घटना घडून लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.

भविष्यात भुसावळ शहराचा वेगवान विस्तार लक्षात घेता प्रवाश्यांमध्ये वाढ होईल परीणामी हा चौक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये अचानक वाढ होणार असल्याची शक्यता होती. वांजोळा चौफुलीवर अंडर पास होण्यासाठी वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवायचे सरपंच व शहरातील नगरसेवक यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे निवेदन दिलेले होते. यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता, या मागणीला यश मिळून शुक्रवारी नहीचे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा यांनी खासदार रक्षा खडसे यांना मंजुरीचे पत्र पाठवले.

Leave A Reply

Your email address will not be published.