वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अँड. विश्वासराव भोसले यांचे साकडे

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या पिंपरखेड येथील रहिवासी अँड. विश्वासराव भोसले तथा प्रगतिशील शेतकरी हे वसंत सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत वारंवार शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करत आलेले आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरू देखील झाला होता.

 

यावेळी त्यांनी संवाद यात्रेच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देताना म्हटले की वसंत सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील सात तालुक्यातील बाराशे १२५० मेट्रिक टन क्षमतेचा व ४०,००० लिटर क्षमतेची डिक्शनरी असलेला कारखाना सन २००६-०७ पासून योग्य त्या नेतृत्वाअभावी व मागील काळातील अनागोंदी कारभारामुळे बंद आहे गेल्या दोन वर्षापासून उच्चांकी पाऊस झाल्यामुळे गिरणा धरण अंजनी धरण प्रकल्प व इतर प्रकल्प १००% भरल्यामुळे तसेच पाठ साऱ्यांना पाणी असल्यामुळे ऊस हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने परवडणारे पीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झालेले आहे.

 

तसेच वसंत सहकारी साखर कारखान्याची मशनरी सुस्थितीत आहे व परिसराचे भौगोलिक स्थिती देखील अतिशय उत्तम आहे आज रोजी कारखान्याचे मालकीची २८२ एकर जमीन असून कारखाना कार्यक्षेत्रात ४२१ गावे असून १४७०० सभासद आहेत.

 

तसेच सदर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग सुद्धा उपलब्ध आहे व आज रोजी सदर चा कारखाना माननीय साखर आयुक्त पुणे यांच्या आदेशाने अवसायक म्हणून मासे जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आहे तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करावा कारण यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे तरी वरील सर्व परिस्थितीचा शासन स्तरावर विचार व्हावा आणि वसंत सहकारी साखर कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे यासाठी नुकत्याच संवाद यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले असता त्यांना अँड.  विश्वासराव भोसले यांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.