वसंतराव नाईक कक्षाचे विरोधकांकडून उद्घाटन

0

जळगाव।
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेला माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाचे एक सभागृह असावे अशी सुचना शासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेने सदस्यांना बसण्यासाठी एक कक्ष स्थापन केले असून या कक्षाला स्व.वसंतराव नाईक यांचे नाव दिले आहे. याकक्षाचे उद्घाटन बुधवारी 4 रोजी ठेवण्यात आले होते. त्यासाठी फीत वगैरे लावण्यात आलेली होती. मात्र सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्यांनी या उद्घाटनाकडे पाठ फिरविल्याने अखेर विरोधकांनी याकक्षाचे उद्घाटन केले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन यांनी याकक्षाचे उद्घाटन केले.
बुधवारी स्थायी समिती सभा होती. त्यानिमित्त सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने वसंतराव नाईक कक्षाचे उद्घाटन ठेवण्यात आले होते. मात्र स्थायी समिती सभा संपल्यानंतर लागलीच जि.प.पदाधिकारी जामनेर नगरपरिषदेच्या प्रचाराला निघून गेले. उद्घाटनासाठी सकाळपासून फीत लावण्यात आलेली होती मात्र पदाधिकारी निघून गेल्याने उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात येत होते. मात्र पदाधिकार्यांनी पक्षाच्या प्रचाराला महत्व देत उद्घाटनाकडे दुर्लक्ष केले. पदाधिकार्यांकडून स्व.वसंतराव नाईक यांचे अपमान करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.