पारोळा | प्रतिनिधी
वसंतनगर ता पारोळा येथील गावातील गायरानात अज्ञात व्यक्ती कडून सुमारे दोन अडीच हजार कोंबड्या सोडून देण्याची घटना घडली . यामुळे या गावातील लोक भयभीत झाले आहे .
या बाबत वृत्त असे की , कोरोना विषाणू मुळे देश लॉक डाऊन आहे . पोल्ट्रीफॉर्म चालक कोरोना मुळे त्रस्त आहेत . पोल्ट्रीफॉर्म व्यवसायावर संक्रात आली आहे . यामुळे अनेक पोल्ट्री फॉर्मवर कोंबड्या पडून आहेत . या प्रकारातून वसंतनगर च्या गायरानात एका अज्ञात व्यक्ती कडून कोंबड्या सोडून दिल्याने , त्यात उन्हाच्या त्रासाने निम्म्या च्या वर कोंबड्या या मृत स्थितीत आढळून आल्यात . तर उर्वरित कोंबड्या या गायरानात हिंडताना दिसून आल्यात .
या वेळी कोरोनाबाधीत कोंबड्या कोणी सोडून तर गेल्या नाहीत ना ? अशी शंका ग्रामस्थांच्या मध्ये निर्माण झाली आहे . यामुळे या गायरानात सोडून निम्म्या हुन अधिक कोंबड्या मृत झाल्या आहेत. या पासून काही रोगराई तर निर्माण होणार नाही ना ? अशी भीती व्यक्त केली जात आहे .
अनेकांनी गायरानात ह्या सोडलेल्या कोंबड्या पाहून आश्चर्यचकित झाले . या बाबत गावचे सरपंच अविनाश जाधव ,पोलीस पाटील जाधव यांनी पोलीस ठाण्यात या घटने बाबत माहिती दिली आहे.
माजी सभापती प्रकाश जाधव यांनी सर्व कोंबड्या मृत राहिल्या असत्या तर , जे.सी.बी लावून खड्डा करून पुरल्या असत्या. पण जिवंत कोंबड्या ह्या अन्न पाण्या वाचून आज ना उद्या मारणार. मग त्या मृत कोंबड्या पासून रोगराई पसरली , तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे .