वलवाडीत बिबट्याने केले वासरु फस्त ; शेतकरी वर्गात भितीचे वातावरण

0

भडगाव :- तालुक्यातील वलवाङी शिवारातील हिलाल किसन पाटील यांच्या शेतात बिबटयाने गायीचे वासरु फस्त केल्याची घटना घङली. ही घटना दि.९ रोजी राञीच्या सुमारास घङली. सध्या शेतशिवारात खरीप हंगाम पिक पेरण्यांसह शेती कामे जोरात सुरु आहेत. या घटनेमुळे शेतकरी वर्गासह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याचे चिञ आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या पाहणीत बिबटयाच असल्याचे लक्षणे दिसत असल्याची माहिती दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.

वलवाङी ते आमङदे रस्त्यालगत हिलाल किसन पाटील यांचे वलवाङी शिवारात शेत आहे. शेतात उघङयावर गायीचे वासरु  बांधलेले होते. अचानक राञीच्या अंधारात बिबटयाने या गायीच्या वासरुला हल्ला करीत नाल्याकङे ओढत नेले. या हल्यात या वासरुचा मृत्यु झाला.ही घटना सकाळीस उघङकीस आली. हिलाल पाटील  या शेतकर्याने आरङा ओरङ करताच इतर शेतकर्यांनी घटनास्थळी  धाव घेतली. घटना स्थळी भङगावचे वनपाल सरीता पाटील यांचेसह वनकर्मचार्यांनी  सकाळी तात्काळ  भेट देउन पाहणी केली. बिबटयाच असल्याचे लक्षण दिसत असुन शेतकरी व नागरीकांनी सावधानता बाळगावी. अशा सुचना वनपाल सरीता पाटील यांनी दिल्या. यावेळी सरपंच अशोक पाटील, हिलाल पाटील यांचेसह शेतकरी उपस्थित होते. हा बिबटयाच असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकार्यांसह शेतकरी वर्गाने केलेला आहे. शेत शिवारांमध्ये शेती कामे करणार्या शेतकरी, मजुरवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. तरी वनविभागाने या बिबटयाला तात्काळ जेरबंद करावे. अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.