वर्ष प्रतिपदेनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुऱ्हा येथे पथसंचलन !

0

मुक्ताईनगर लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कुऱ्हा येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी आठ वाजता शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले, ज्यामध्ये 350 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये 300 स्वयंसेवक गणवेश धारण करून तर 50 स्वयंसेवक मंगल वेशात सहभागी झाले होते. या संचलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर येथील डॉ. गजेंद्र पाटील उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह चंद्रशेखर पाटील आणि जिल्हा बौद्धिक प्रमुख चंद्रकांत राऊत यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. गजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर चंद्रशेखर पाटील यांनी भारताच्या सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आगामी शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या पुढील वाटचालीबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये योगेश नेटके यांची जिल्हा योग प्रमुख, गजानन चौधरी यांची जिल्हा समरसता सह संयोजक, डॉ. मनोज महाजन यांची मुक्ताईनगर तालुका संघ चालक, ज्ञानेश्वर न्हावकर यांची तालुका कार्यवाह, राजेश पाटील यांची तालुका सहकार्यवाह, कुणाल सोनार यांची शारीरिक प्रमुख, रोहित धनगर यांची शारीरिक सहप्रमुख, श्रीकांत अरगडे यांची बौद्धिक प्रमुख, मोहन मुळे यांची सह बौद्धिक प्रमुख, गोपाळ चौधरी यांची कार्यकारिणी सदस्य, दीपक ठाकरे यांची कार्यालय प्रमुख, आदित्य नाईक यांची महाविद्यालयीन प्रमुख आणि राहुल जावरे यांची व्यवस्था प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच उपखंड आणि मंडल प्रमुखांचीही घोषणा करण्यात आली.

कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी कुऱ्हा उपखंडातील सर्व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.