वर्षभरात पॅसेंजर गाड्यांचे मेमूत परिवर्तन ː जीएम शर्मा

0

 रेल्वे महाप्रबंधकांचा भुसावळसह मनमाड दौरा
भुसावळ | प्रतिनिधी
 मध्य रेल्वेतील विकसीत विभागांमध्ये सुरु असलेल्या स्लो व पॅसेंजर गाड्यांचे मेमू गाडीत परिवर्तन करण्यात येत आहे. साधारण तीन महिने ते वर्षभराच्या कालावधीत त्या  कार्यरत होण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.
ते दि.१५ रोजी भुसावळ विभागातील मनमाड व भुसावळ येथे पाहणी दौर्‍यावर आले असतांना येथील डीआरएम कार्यालयात सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा, सिनीयर डिसीयम आर. के. शर्मा, सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे यांच्यासह विविध विभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाव्यवस्थापक डी.के. शर्मा म्हणाले की, पहाणी दरम्यान भुसावळ विभागात चांगले कामे होत आहेत तीन वर्षात विभागात मोठ्या प्रमाणात विविध सुधारणा झाल्याने प्रवाशांना उत्तम सोई व सुविधा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दौर्‍यात मनमाड स्थानकांवरील सिव्हील ट्रीटमेंट प्लँट, सीसीटीव्ही, डिस्ल्पे कोच बोर्डची पहाणी केली. तसेच भुसावळ विभागात विविध शाखांची माहिती घेतली. त्यात सुरक्षा, संरक्षण, मालमत्ता व वेळेचे नियोजना चांगले आहे. यापुढे देखिल मुख्यालयात आवश्यात आध्याधुनिक विकासासाठी त्वरीत सहकार्य करण्यात येईल. रेल्वे स्थानकावरील वाहन पार्कींगला शेडची सुविधेबाबत विचार करु. शेगाव स्थानकारील पार्कींग ठेका संपूनही ठेकेदार वाहनधारकांकडून फी वसुल करतो. वाहन चोरी होवूनही दखल घेत नाही. याबाबतही चौकशीचे आदेश दिले.येथील झेडआयटीआच्या ५२ रुमच्या हॉस्टेलची पहाणी केली तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांसोबत विविध विषयांवर चर्चा करुन माहिती जाणून समस्यांचे निराकरणाचे आश्‍वासन दिले.
जीएमची भुसावळला पुन्हा भेट
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डि. के. शर्मा हे लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर आले असलेले महाव्यवस्थापक शर्मा पुन्हा महिनाभरानंतर भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर सपत्नीक आल्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.