नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
महिला तलाठ्याकडे वरिष्ठ अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. संशयित आरोपी वरिष्ठ महसुल अधिका-याने केलेल्या शरीरसुखाची मागणीच्या प्रकाराची व बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी संबधीत महिला तलाठ्याने बदली रद्द केली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील या घटनेमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. बदली रद्द करण्यासाठी तलाठी महिलेकडे करण्यात आलेल्या शरीरसुखाच्या मागणीचा आरोप निराधार असल्याचे सदर अधिका-याने म्हटले आहे. दरम्यान या प्रकारामुळे महसुल विभागात मात्र बरीच खळबळ उडाली आहे.