वरणगाव : नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्री पासुन पुर्वीच्या असलेल्या महार्गाला फुलगाव ते आयुध निर्माणीच्या प्रवेश द्वारा पर्यतच्या समातर रस्त्याची मागणी मागील काही दिवसा पुर्वी शहर भाजपाच्या वतीने आ सावकरे , व खा रक्षा खडसे कडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याने मंगळवार रोजी प्रकल्प संचालक व माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष या सोबत आमदार यांनी पाहणी करीत या रस्त्याचा प्रश्र लवकरच सोडविणार असल्याचे आश्वासन दिले
फुलगाव पासुन ते आयुध निर्माणीच्या प्रवेश द्वारा पर्यतचा पुर्वीच्या राष्ट्रीय महामार्गाला समातर रस्ता करूण त्यात दुभाजक टाकुन पथदिवे बसविण्याची व नवीन चौपद्री रस्त्यावर कठोरा बु ॥ कडे जाणाऱ्या रस्त्याला जोड तयार करण्यात यावा तसेच फुलगाव येथील रेल्वे फाटक सुरु ठेवण्याची मागणी केंद्रीय मंत्री ना नितिन गडकरी , खा रक्षा खडसे , व आमदार संजय सावकारे यांचे कडे शहर भाजपाचे सुनिल काळे व त्यांचे सहकारी शे अखलाक शे युसुफ ,शहर अध्यक्ष सुनिल माळी , संदिप भोई ,प्रशांत पाटील राजकुमार चौधरी , हितेश चौधरी मिलीद भैसे यानी केल्याने आमदार संजय सावकारे व प्रकल्प संचालक सिन्हा यांच्या सोबत प्रत्येक्ष जागेची पाहणी करीत रस्ता प्रकल्प संचालकास आनदारानी या सर्व मागण्या जनहिताच्या असल्याने वरणगावकरावर अन्याय होणार नाही व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडून रस्ता करूण देण्याच्या सुचना सिन्हा यांना देत लवकरात लवकर हा प्रश्र सोडविण्याचे सागीतले
या वेळी शहर भाजपाचे , कठोरा भाजपाचे ,व फुलगाव भाजपाचे कार्यकर्ते उपस्थीत होते