वरणगाव येथे नाभिक समाजातर्फे विविध मागण्याचे निवेदन सादर

0

वरणगांव : येथील नाभिक समाज बांधवांच्या अखिल भारतीय जिवा महाल संघाच्या वतीने भुसावळ तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सोमवार १५जून रोजी सादर करण्यात आले. सदरील निवेदनात नाभिक समाज बांधवांची मुख्य पोट भरण्याचे साधन म्हणजे सलून दुकाने होय ती दुकाने कोविड १९ लॉक डाऊनमुळे गेल्या 3 महिन्यापासून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच घरभाडे ‘ लाईट बिल ‘ किराणा बिल थकल्यामुळे जीवन चरितार्थ चालविणे मुश्किल झाले आहे . त्यासाठी सरकारने तात्काळ10,000 रु मदत द्यावी ‘, तसेच दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, पी .पी.ई – किट पुरवावे, नाभिक बांधवांची नोंदणी करावी, अशा अनेक प्रकारच्या मागण्याचे  निवेदन देऊन आपले मागणे सरकार दरबारी मांडावे अशी विनंती , निवेदनात केली आहे.

निवेदन सादर करतांना त्या ठिकाणी समाज अध्यक्ष कमलेश येवले, तुकाराम सनांसे, संतोष रेलकर,श्रीराम सनांसे, अभय मानकरे, रवींद्र पवार, गोपाळ बाणाईत सर’ राजेन्द्र शिवरामे ‘ अभय मानकरे जितेन्द्र शिवरामे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.