वरणगाव प्रभाग दोनमध्ये गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

0

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव नगरपालिकेच्या जलवाहिनीतून प्रभाग क्रमांक दोनमध्ये गटारीच्या वासासारखे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बऱ्याच दिवसापासून होत होता. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता संतप्त स्थानिक रहिवासी यांनी नगरपालिकेत धडक देऊन पाणी पुरवठा अभियंता चाटे यांना जाब विचारत दुर्गंधी युक्त पाणी पिण्यास सांगितले. तुम्ही हे पाणी पीत नाही, मग आम्ही माणसे आहेत की जनावरे आम्हाला असे पाणी कोरोना काळात मिळेल तर आजाराला निमंत्रण नाही तर काय? असा संताप रहिवास्यांनी व्यक्त केला. पाणी पुरवठा अभियंता भरत चाटे यांनी स्वतः येऊन पाहणी करतो आणि गटारी जवडील लिकेज तात्काळ दुरुस्ती करतो असे आश्वासन दिल्याने रहिवासी माघारी फिरले.

प्रभाग क्रमांक दोन मधील गिदाळी आखाडा या भागात बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेच्या जलवाहिनीतून गटारीच्या वासासारखा उग्र दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत होता. ही माहिती स्थानिक रहिवाशी यांनी नगरपालिका पाणी पुरवठा कर्मचारी यांना सांगितली. परंतु याकडे न. पा. कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची माहिती रहिवासी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांना सांगितली. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त रहिवास्यांनी नगरपालिकेत दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन थेट पाणी पुरवठा अभियंता भरत चाटे यांना ते पाणी पिण्यास सांगितले. परंतु चाटे यांनी हे पाणी पिण्यास नकार दिला. तुम्ही हे पाणी पिऊ शकत नाही मग आम्ही का जनावर आहे का? आम्हाला असे पाणी पिण्यास तुम्ही देत आहे.

सध्या कोरोना सारखी महामारी सुरु आहे. दुर्गंधी युक्त पाणी पिऊन बरेच नागरिकांना जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. आजारी पडले तर डॉक्टर घेत नाही आहे, आमच्याकडे मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी पैसे नाही, असा संताप रहिवासी्यांनी व्यक्त केला. तुम्ही तात्काळ याकडे लक्ष घाला. आणि दुर्गंधी युक्त होणारा पाणी पुरवठाची लिकेज जलवहिनी दुरुस्ती करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे संतोष माळी आणि स्थानिक रहिवासी यांनी पाणी पुरवठा अभियंता भरत चाटे यांना केली. दूषित पाणी पुरवठा करणारी लिकेज जलवाहिनी तात्काळ दुरुस्ती करतो, असे आश्वासन भरत चाटे यांनी संतोष माळी आणि रहिवासी्यांना दिले.

यावेळी फिरोज खान दौलत खान, शेख मुज्जीमिल, सय्यद अझहरअली,अय्युब खान, आवेस खान, जाकीर खान, युनूस मिजवान, आरीफ शेख, कमील खान, इद्रिस खान, आवेस खान, अब्रार खान, शोएब खान, अतुल माळी, अबूबकर खान, सय्यद मझहर आदी उपस्थित होते.

भरत चाटे यांनी शोधली लिकेज जलवाहिनी

प्रभाग दोन मधील रहिवासी आणि संतोष माळी यांनी नगरपालिकेत दूषित पाणी घेऊन गेल्यानंतर पाणी पुरवठा अभियंता चाटे यांनी लगेच न. पा. कर्मचारी तळेले यांना सोबत घेऊन गिदाळी आखाडा येथे लिकेज जलवाहिनीची पाहणी केली. यावेळी महिलांनी भांड्यामध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आणून चाटे यांना पाण्याचा वास घेण्यास सांगून संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.