भुसावळ :- तालुक्या नजीक असलेल्याव वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 3 जून रोजी वरणगाव पालिकेच्या प्रलंबित विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी राज्याचे जलसंपदा गिरीश महाजन यांचे कडे घातले होते. ही कामे होण्यासाठी आता मार्ग सुकर होत असून 11 रोजी मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
वरणगाव शहरासाठी 32 कोटींची वाढीव पाणीपुरवठा शासनाकडे सादर करण्यात आली असून त्यास तत्काळ मंजुरी मिळावी, भूमिगत गटारींचा प्रस्ताव मंजूर करावा, वरणगाव नगरपरीषदेच्या कर्मचार्यांचा शंभर टक्के आकृतीबंध मंजूर करावा, वरणगाव शहरात विकास कामांसाठी भरीव निधी द्यावा, मंजूर रेल्वे स्टेशन ते बसस्थानक रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे , भोगावती नदी खोलीकरण व सुशोभीकरणाच्या प्रलंबित जनहित समस्या तत्काळ मार्गी लागावी, वरणगावात ट्रामा सेंटर मंजूर करावे, आयुध निर्मानी व कब्रस्थानकडे जाणार्या रस्त्यावर पूल तयार करण्यात यावा आदी मागण्यांबाबत जलसंपदा मंत्र्यांना साकडे घालण्यात आले होते शिवाय वरणगाव शहरातील प्रलंबित कामांना मंजुरी मिळण्यासाठी नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिव व आयुक्त तथा संचालक विभागीय आयुक्त जळगावचे जिल्हाधिकारी प्रशासन अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणीही नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली होती. महाजन यांनी मागणीची दखल घेत नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्याशी प्रत्यक्ष मोबाईलवर चर्चा केली तसेच वरणगाव शहरातील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्याबाबत पत्रही दिले. मंगळवार, 11 जून रोजी ही बैठक होत असून यात कुठले शहर विकासाचे विषय मार्गी लागनात आहे.