वरणगाव नागेश्वर मंदिराला पाच कोटींचा निधी मंजूर

0

वरणगाव :- वरणगाव नागेश्वर मंदिराच्या निधीला राज्याचे जलसंपदा मंत्री ना गिरिष भाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री ना देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे पाच कोटी रुपयांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती नामदार गिरिषभाऊ महाजन व आ संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी वरणगाव येथील नागेश्वर मंदिरास दोन कोटी ७३लाख रुपये राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मंजूर केले आहे एकूण चार कोटी ९५लाखा चा प्रस्ताव नगरपरिषद वरणगाव यांच्या वतीने सादर केला होता त्यानुसार नागेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी ७३लाख मंजूर केल्याने वरणगाव परिसरातील भाविकांच्या सुख सुविधा प्राप्त होणार आहे यात सभामंडपास नव्वद लाख ,शौचालय बारा लाख शासकिय विश्रामगृहा पासुन दुभाजक टाकून रस्ता करण्या साठी ७५लाख अंतर्गत रस्ते सातलाख पेव्हर ब्लॉक बारा लाख स्वरक्षण भिंत नऊ लाख बगीचा साठी दहा लाख पाणी व विद्युतीकरणा साठी नऊ लाख रुपये निधी मंजुर झाला आहे त्यात भविकांसाठो भक्त निवास पाण्याची सुविधा यासह अनेक कामे त्यातून होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली असून जलसंपदा मंत्री नामदार गिरिष भाऊ महाजन पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल आमदार संजय सावकारे यांचे आभार नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक नगरसेविका माला मेंढे नसरीबी साजिद कुरेशी मेहनाजबी इरफान पिंजारी शशी कोलते राजेंद्र चौधरी रवी सोनवणे यांनी आभार व्यक्त केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.