वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करा !

वरणगाव (प्रतिनिधी)- येथील ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. तसेच वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी रूग्णालय ‘कोविड सेंटर’ साठी शासनाने ताब्यात घ्यावे. रुग्णकल्याण समिती बरखास्त करून नवीन स्थापन करावी, अशा विविध मागणीचे निवेदन बुधवार ३ जून रोजी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांना देण्यात आले.

जळगाव जिह्यात कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे बुधवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. भुसावळमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भुसावळलाही %A

Comments are closed.