वरणगावात महिला आरोग्य तपासणी व कॅन्सर अव्हेरन्स कॅम्पचे आयोजन

0

भुसावळ :- प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्यातर्फे नेहमी वेगवेगळी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अनुषंघाने वरणगावात महिला आरोग्य तपासणी व कॅन्सर अव्हेरन्स कॅम्पचे आयोजन महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता करण्यात आले आहे. कॅन्सर अव्हेरन्स कॅम्प व भव्य आरोग्य तपासणी शिबिर दि.29 जून रोजी सकाळी 10 वाजता वरणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

यात जळगावचे सुप्रसिध्ध सर्जन डॉ.निलेश चांडक कॅन्सर  विषयी जनमानसात असलेली भीती व गैरसमज दूर करून अमूल्य असे मार्गदर्शन करणार आहे तसेच भुसावळ च्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ दीपा रत्नांनी व डॉ जान्हवी पाटील महिलांची तपासणी करणार आहे. शिबिराचे उदघाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती लाभणार आहे .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुनील काळे नगराध्यक्ष वरणगाव प्रीतिताई पाटील(पं. स.सभापती), वंदनाताई उन्हाळे (पं. स.उपसभापती), सुधाकर जावळे (तालुकाध्यक्ष ) सर्व नगरसेवक  ,नगरसेविका व  पं. स.सदस्य ग्रामीण रुग्णालय आदी उपस्थित राहणार आहे.तरी वरणगाव व परिसरातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.