वरणगांव : येथे दारू दुकानावर दारू खरेदीसाठी जणू काही जत्राच भरल्याचे चित्र होते. शहरातील दारू विक्रीची परवानगी मिळालेल्या विकास ब्रॅन्डी हाऊस या दुकानावर दारु साठी व्याकुळ झालेल्या तळीरामांनी सकाळी ६ वाजेपासुन लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शहरातील या भागाला जणू काही यात्रेचे स्वरूप आले होते.
प्रत्येकाला हमारा नं कब आयेगा याची आस लागली होती. सुरुवातीला थोडा वेळ येथे थातुर मातूर बंदोबस्ताचा बनाव करण्यात आला. पंरतु दुकान ११ वा उघडण्याचा आधी या ठिकाणी तुफान गर्दी झाती होती व सोशल डिस्ट सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आता झपाट्याने वाढेल अशी चर्चा सुज नागरिक करीत होते. मात्र तळीरामांना याचे काहीच सोयरसुतक दिसत नव्हते. आधीच आपला जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे व भुसावळ येथील वाढती कोरोनाची संख्या पाहाता अशा सोशल डिस्टंसींग चे नियम न पाळणाऱ्या ठिकाणांवर योग्य प्रकारे बंदोबस्त ठेवून कार्यवाही करणे गरजेचे आहे.