वरणगांव (प्रतिनिधी) : वरणगांव शहरातील एका इसमाने सोशल मिडीयावर दोन धर्मात तेढ निर्माव होईल असा संदेश टाकल्यामुळे वरणगांव पोलीसांनी सायबर गुन्ह्यातर्गत याच्यावर कारवाई केल्याने शहर व परीसरात खळबळ उडाली उसुन खोट्या अफवा पसरवु नये असे आवाहन सपोनि संदीप कुमार बोरसे यांनी केले आहे
याबाबत सविस्तर असे कि वरणगांव शहरातील शिवाजी चौक ( मोठी होळी ) येथील रहीवासी संजय प्रभाकर परदेशी ( वय -५६ ) याने सोशल मिडीयावर दोन धर्मात तेढ निर्माण होईल संदेश प्रसारीत केला हि बाब सायबर क्रामई ब्राचच्या लक्षात येताय त्यांनी याबाबत वरणगाव पोलीसा ना माहीती दिली . त्यानुसार वरणगांव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप बोरस यांच्या सुचनेनुसार पोहकॉ राहुल येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला . वरणगांव शहरात खोटी अफवा व दोन समाजात तेढ निर्माण होईल असा संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे .
पोलीसांचे आवाहन
सोशल मिडीयावर अपेक्षार्ह मजकूर टाकुन खोटी अफवा पसरविणात्यावर कठोर कारवाही केली जाणार जाईल यांची सर्वानी दक्षता द्यावी असे आवाहन वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संदिप बोरसे यांनी केले आहे