वरणगांव : शहराच्या थोडयाच अतंरावरील हॉटेल ओम साईच्या जवळून चार संशयीतांना नगरपरिषदेचे कर्मचारी व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात रवाना केल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत वृत असे की, गावातील माळी वाड्यातील रहिवाशी तरुण हा थोडा वेडसर असल्याने नेहमी त्यांची भटकंती राहत असल्याने मागील एका ते दीड महिन्या पुर्वी तो पुण्याला होता. मात्र, संचार बंदी असल्याने तो सरळ आपल्या गावी पायी गेल्या चार दिवसा पुर्वी चालत येऊन त्याचा मुक्कम येथील नागेश्वर मदिरावर असल्याची माहिती नगर परिषदेला मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात तपासणी साठी आणले होते. तेव्हा डॉक्टरानी त्याला जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, संशीयत रुग्ण तेथून पसार झाला होता. त्या नंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो सापडला नाही. आज दुपारी शहराच्या जवळच असलेल्या हॉटेल ओम साईच्या जवळ या तरुणा सोबत शाहापुर ता.जामनेर व सुनसगाव ता.भुसावळ येथील दोन तरुण असल्याची माहिती मिळताच नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या परिसाराकडे धाव घेऊन १०८ रुग्णवाहीकेत करण्यात आली.
तर चौथा रूग्ण हा माळी वाडयातील वेडसर तरुणाच्या संपर्कात त्यांचा मोठा भाऊ आला असल्याने त्याच्यासह चार संशयीत रुग्णाला जळगाव येथे रवाना करण्यात आल्याची वार्ता शहरात पसरताच सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या तरुणाचा मकंरद नगर मध्ये वावर
वेडसर तरुणाचा नागेश्वर व जवळच असलेल्या मकरदनगर परिसरात वावर असून या परिसरातील रहिवाशात भितीचे वातावरण निर्माण झाले असून हा संपुर्ण परिसरात तात्काळ जंतूनाशक , सॅनीटॉझरची फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.