वरणगावला मजुराची आत्महत्या

0

वरणगाव : शहरातील नारी मळा परिसरातील हरि विठ्ठल नगरमधील रहिवाशी असलेल्या मजुराने रागाच्या भरात विहीरीत उडी मारूण आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजेच्या समारास उघडकीस आली.

या बाबत वृत असे की, शहरातील हरि विठ्ठल नगर मधील रहिवाशी गोपाळ पुंडलीक महाजन ( ४८ ) हे शनिवारी रात्री मजुरीचे काम करुन दारुच्या नशेत घरी आल्यानतंर त्यांना त्यांच्या पत्नीने दारू पिऊन घरी का आले असा जाब विचारल्याने त्यांना या गोष्टीचा राग येऊन शनिवारच्या रात्री पासुन ते घारातुन निघुन गेले होते. बराच झाल्याने घरातील नातेवाईकानी त्यांचा शोधा घेतला मात्र कोठूही सापडले नाही मात्र सोमवारच्या सहा वाजेच्या सुमारास त्याच्या मूलगा आकाश हा दोन दिवस झाले वडिल घरी आले नाही. म्हणुन शोधण्या साठी मारी मळा परिसरातील शेतकरी भरत झोपे यांच्या शेताकडे पाहण्यासाठी गेला असता त्याला त्याच शेतातल्या विहिरीत त्यांच वडील मृत अवस्थेत दिसले. हि घटना कळताच नगरसेवक राजेंद्र चौधरी प्रकाश नारखेडे व होमगार्ड राजु फालक यांना कळताच घटना स्थळाकडे धाव घेऊन नागरिकाच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढून शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात आणले डॉ क्षितिजा हेडवे यांनी शवविच्छेदन करूण मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला.

या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयताचा मुलगा आकाश गोपाळ महाजन याच्या खबरीवरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास सह्य फौजदार सुनिल वाणी पो हे कॉ जावेद शेख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.