वरणगावच्या इसमाचा तापीनदीपात्रात अढळला मृतदेह

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामपेठ परिसरातील रहिवाशी असलेल्या एका ४७ वर्षीय इसमाचा मृतदेह तापीनदी पात्रात आज दि ४ रोजी आढळून आला आहे.

या बाबत वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे कि रामपेठ परिसरातील रहिवाशी असलेले मनोज मोहनदास बैरागी (४७) हे गेल्या दोन दिवसापुर्वी पुतण्या निखील यांचा कडून शंभर घेत माझ्या मित्राला हतनुर धरण येथुन भेटून येतो असे सांगुन गेले. त्या नंतर घरी परतलेच नाही. मात्र तपत कठोरा या गावाच्या तापी नदीच्या काठावर गावकऱ्याना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसताच त्यांनी पोलीस पाटील यांना कळविले त्यांनी घटनेची खबर वरणगाव पोलीस स्टेशनला देऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणुन ओळख पठविण्यासाठी निखील याला पाचरण करण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटवुन हा मृतदेह काका मनोज याचाच आहे खात्री झाली.
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला निखील बालकदास बौरागीच्या खबरीवरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली आसुन घटनेचा पुढील तपास पो, हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.
शवविच्छेदन डॉ क्षितीजा हेडवे यांनी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.