वरणगांव येथे स्वामी समर्थ हॉलचे भुमी पुजन

0

वरणगांव शहरातील  रेणूका नगर परिसरात स्वामी समर्थ मंदीराजवळ समर्थ हॉलचे .भुमी पुजन शिवजयंती दिनी संपन्न झाले .

या प्रसंगी प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी नगराध्ययक्ष सुनिल काळे , उपनगराध्यक्ष शेख . अखलाख . नगरसेविका शशी कोलते , माला मेढे , रोहीणी जावळे , अरुणा .इंगळे , नगरसेवक राजेंद्र ‘ चौधरी , सुधाकर जावळे , मुख्याधिकारी शाम गोसावी , समाजसेवक संजीव कोलते , मिलींद मेढे , महेंद्र शर्मा , इरफान पिंजारी , कलीम भाई आदी मान्यवर उपस्थीत होते .

मान्यवरांच्या हस्ते भुमी पुजन व कुदळ मारून कार्यारंभ करण्यात आला , यावेळी सुनिल काळे यांनी येत्या न.पा . निवडणूकीत विकासाला मत देण्याचे सांगितले , तर संजीव कोलते यांनी वार्डाचा विकास हेच ध्येय असल्याचे सांगितले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेणूका नगर , शिवाजी नगर सह परिसरातील जेष्ठ नागरीक ,महीला , युवा कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.