वरणगांव पोलीस स्टेशनला गिरीश तायडे विरुद्ध गुन्हा दाखल !

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरणगांव पोलीस स्टेशनला राजू सुर्यवंशी व अनंत सुर्यवंशी विरुद्ध दिनांक ९ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच १२ मार्च रोजी किंबिंग ऑपरेशन दरम्यान राजू सुर्यवंशी यास मध्यरात्री अटक केली होती.तर अनंत सुर्यवंशी यास सकाळी ताब्यात घेण्यात आले होते.या दोघे आरोपितास भुसावळ न्यायालयात हजर १२ मार्च रोजी हजर केले असता १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सूनविण्यात आलेली आहे.सदर आरोपीस दिनांक १४ मार्च रोजी  १० वाजेच्या सुमारास वरणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात  शासकीय जागेत दारूच्या नशेत अनधिकृत प्रवेश करून अटक आरोपितास भेटू न दिल्याचा राग आल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, स.फै.पो.कॉ. चालक अशा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून सपोनि यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी वरणगांव पोलीस स्टेशनला गिरीश तायडे विरुद्ध दिनांक १५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की ,फिर्यादी पो.कॉ.3078 अतुल भगवान बोडदे नेमणूक वरणगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गिरीष देविदास तायडे वय 36 राहणार खडका हा दिनांक 14 मार्च 2021 रोजी 10 वाजेच्या सुमारास वरणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात शासकीय जागेत दारूच्या नशेत अनधिकृत पोलीस स्टेशनला येऊन अटक आरोपितास भेटू न दिल्याचा राग आल्याने सपोनी संदीप कुमार बोरसे,पोउनिरी.सुनील वाणी, स.फै.अनिल चौधरी,पो.कॉ.राहुल येवले,राजहंस,भूषण माळी, चालक,पो.कॉ.प्रमोद कंखरे अशांना शिवीगाळ करून सपोनी संदीप कुमार बोरसे यांना धक्काबुक्की करून मी पवार साहेब यांचे वर अँटीकरेपशनची केस केली आहे.तुम्हाला ही तसेच फसविल अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला असून त्यांच्या अंगझडतीस लोखंडी चाकू मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध गुरुन 40/2021 भादवी कलम 353,186,504,506,म.दा.का. क. 85(1) मु.पो.का.कलम 120,37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दिनांक 15/3/2021 रोजी 2.58 वाजेला अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.