भडगाव ( प्रतिनिधी ): सुपडू भादू पाटील विद्यामंदिर पाचोरा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भडगाव येथील रहिवासी दीपक पाटील यांनी आपले लहान बंधू कै. अमोल पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त वरखेड दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनमोल बाल वाचनालयासाठी पुस्तके व ते ठेवण्यासाठी कपाट भेट म्हणुन दिले. याप्रसंगी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपक पाटील यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक भिकन चव्हाण यांनी केले. मनोगतातून दीपक पाटील यांनी आपल्या लहान बंधूच्या आठवणी सांगितल्या. त्यांची वाचनाची आवड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लागावी, या उद्देशाने ते तीन वर्षापासून आपल्या भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध शाळांमध्ये पुस्तके व ते ठेवण्यासाठी कपाट देखीलभेट म्हणून देत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले. उषाबाई सूर्यवंशी, मनोहर पाटील, अशोक गायकवाड यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शासनाचे दिशानिर्देश पाळून काही विद्यार्थी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post