पारोळा | प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसमणी येथे हिस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेत मजुर ननेरिया जिनला पावरा हा शेतात काम करीत असताना जखमी झाला हेाता.त्यास वनविभागामार्फत वीस हजार रुपयाची आर्थिक मदत ता,16 रोजी देण्यात आली.यावेळी नुकसान भरपाई 20 हजार रुपयांच्या धनादेश बाजार समिती सभापती तथा संचालक जिल्हा बँक अमोल पाटील, जि.प.सदस्य डॉ हर्षल माने,शेतकरी सहकारी संघ संचालक चेतन पाटील.वनविभागाचे कर्मचारी श्रीमती सरोज मोरे, वैशाली सिसोदे व शिरसमणी येथील नीरजंन पाटील,प्रवीण पाटील,सुभाष बोरसे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
तालुक्यात बराच परिसरात हिस्र प्राण्यांनी जनावरे व लोकांना जखमी केले आहे याबाबत तात्काऴ वनविभागाने अंमलबजावणी करुन जखमी झालेल्या, लाभार्थीना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी असे अमोल पाटील यांनी सांगितले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post