वकिल पत्नीची निघृण हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला सहा दिवसांची कोठडी

0

जामनेर दि. 15-
महिला सरकारी वकिल राखी उर्फ विद्या भरत पाटील यांचे हत्येप्रकरणी पती डॉ. भरत लालसिंग पाटील यांना काल पोलिसांनी अटक केल्यानंतर आज जामनेर कोर्टात हजर केले असता न्या. ए.ए. कुळकर्णी यांनी सहा दिवसांची म्हणजे येत्या 20 जानेवारीपर्यंत पोलिस कस्टडी ठोठावली. दुसरे आरोपी अ‍ॅड. विद्याचे सासरे लालसिंग राजपूत हे फरार झो असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
रविवार दि. 13 जानेवारीला रात्री येथील सुपारी बागेच्या मागे असलेल्या निवासस्थानी अ‍ॅड. विद्याची हत्या करून पती डॉ. भरत पाटील यांनी विद्याचा मृतदेह कारमध्ये टाकून तो मृतदेह भुसावळ तालुक्यातील बेलखेड या डॉ. भरत पाटलाच्या गावी अंत्यविधीसाठी नेण्यात आले. दरम्यान अ‍ॅड. विद्याचा हृदयविकाराचा झटका आला असून तिला घेऊन मी भुसावळ येथे रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याचा फोन विद्याच्या माहेर बोहर्डे येथे मध्यरात्री दिड वाजता केला. विद्याचे नातेवाईक भुसावळ शहरातील सर्व दवाखान्यात विद्या नसल्याने हे सर्व नातेवाईक बेलखेडला गेले. तेथे विद्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उद्या म्हणजे सोमवारी तिचा अत्यविधी करायचा म्हटल्यावर विद्याच्या नातेवाईकांनी विरोध केला. पोस्टमार्टम केल्याशिवाय अत्यंविधी करणार नाही असे सांगताच वरणगाव ग्रामीण रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी प्रेत नेण्यात आले. परंतु प्रकरण गंभीर असल्याने सोमवारी दुपारी 12 वाजता जिल्हा रुग्णालयात तीन डॉक्टरांच्या पॅनलने विद्याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम केला.
जामनेर पोलिस स्टेशनला विद्याचा चुलत भावाने फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. परंतु डॉक्ट्रला अटक झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा नातेवाईकांनी पवित्रा घेतल्यामुळे डॉ. भरत पाटलाला पोलिसांनी अटक केली. सासरे लालसिंग पाटील हे सुद्धा आरोपी असून ते फरार आहेत.
आज डॉ. भरत पाटील यांना जामनेर पोलिसांनी कोर्टात न्या. ए.ए. कुळकर्णी यांचे समोर हजर केले तेव्हा सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल सारस्वत यांनी काम पाहिले. आरोपी अ‍ॅड. यांचेतर्फे कोणीही वकिल नव्हते. तेव्हा न्यायालयाने त्यांना विचारले सरकारी खर्चाने तुम्हाला वकिल लावायचे काय? परंतु आज न्यायालयाला सुटी असल्याने एकही वकिल हजर नव्हता.
अ‍ॅड. विद्या राजपूत हिच्या निघृण हत्येने जामनेर शहर हादरले आहे. सोमवारी आणि मंगळवारी जिकडे तिकडे या घटनेचीच चर्चा होती.

आरोपीचे वकिलपत्र घ्यायचे नाही
जामनेर वकिल संघाचा ठाव
महिला सरकारी वकिल अ‍ॅड. विद्या राजपूत हिची हत्या करणारे तिचे पती डॉ. भरत पाटील यांचे वकिलपत्र घ्यायचे नाही असा ठराव जामनेर वकिल संघाने काल केला. आज कोर्टाला सुटी असल्याने सरकारी वकिलाव्यतिरिक्त एकही वकिल कोर्टात हजर नव्हता. त्यामुळे आज डॉ. भरत पाटलाला वकिलच मिळाला नाही.

सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद
जामनेर कोर्टात आरोपी डॉ. भरत पाटील यांना अटक करू पोलिसांनी हजर केल्यानंतर सरकारी वकिल अ‍ॅड. अनिल सारस्वत यांनी केलेला युक्तीवाद असा
1) या ठिकाणी अ‍ॅड. विद्याची हत्या झालीय त्या घटनास्थळाचा बारकाईने तपासणी करायची आहे. 2) या वाहनातून विद्याचा मृतदेह नेण्यात आला ते वाहन जप्त करायचे आहे. आरोपीबरोबर आणखी कोण होते त्याचा तपास करायचा आहे. 3) आरोपी बरोबर इतर आणखी कोणी आरोपी आहेत काय? याचा तपास करण्यासाठी आरोपी पोलिस कस्टडीत हवाय.

Leave A Reply

Your email address will not be published.