वकिलासह जळगाव शहरातून चौघे बेपत्ता

0

रामानंद, शहर व जिल्हापेठ पोलिसात तक्रार पोलिसांकडून शोध सुरु

जळगाव, दि.24 –
शहरातील पिंप्राळा हुडको येथील 24 वर्षीय तरुण, शिवाजी नगरातील प्रौढ, नवीन जोशी कॉलनीतील वकील तर प्रताप नगरातील प्रौढ असे चौघे जण शहरातून बेपत्ता झाले आहेत. चौघांच्या कुटुंबियांनी रामानंद, शहर व जिल्हापेठ पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून या चारही व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
बाहेरगावी जातो सांगून तरुण बेपत्ता
शहरातील पिंप्राळा हुडको येथील शिवराम गोपाळ सोनवणे वय 24 हा एका आचार्यारकडे कॅटरिंगचे काम करत होता. जानेवारी महिन्यापासून तो बाहेरगावी कामावर जातो असे सांगून निघून गेला आहे. तो अद्याप घरी न परतल्याने तसेच कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क होवू शकला नसल्याने आज त्याची आई निर्मलाबाई गोपाळ सोनवणे यांनी रामानंद नगर पोलिसात मुलगा शिवराम याच्या हरविल्याची तक्रार दिली आहे.

बँकेतून पैसे काढून येतो सांगून इसम बेपत्ता
बँकेतून पैसे काढून येतो असे सांगून शिवाजीनगर घरकुल येथील ज्ञानेश्‍वमर झगडू शिवदे वय 40 हे दि.23 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घरुन निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या पत्नी ज्योती ज्ञानेश्‍वगर शिवदे यांच्या खबरीवरून शहर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

वकील न परतल्याने पत्नीची तक्रार
शहरातील नविन जोशी कॉलनीतील रहिवाशी असलेले ऍड.पद्माकर बाबुलाल जैन वय 48 हे दि.23 रोजी सकाळी गोलाणी मार्केट येथील कार्यालयात आले होते. त्यानंतर जैन हे बँकेत जावून येतो असे सांगून ऑफीसवरून निघाले. रात्री उशिरापर्यंत ऑफिस किंवा घरी न परतल्याने जैन यांच्या पत्नी नंदा दर्जी यांनी शहर पोलिसात हरविल्याची तक्रार दिली आहे.
दुकानावर गेलेला इसम बेपत्ता
प्रताप नगरातील रहिवाशी असलेले भुषण युवराज पाटील वय 44 यांचे न्यु बी.जे मार्केटमध्ये स्टेशनरीचे दुकान आहे. सकाळी 10 वाजता भुषण पाटील हे दुकानावर जावून येतो असे सांगून घरून निघाले. ते घरी न परतल्याने त्यांचे वडील युवराज मोतीलाल पाटील यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.