जळगाव – मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या भावाकडे कुटुंबीयांसह गेलेल्या वकिलाचे घर फाेडून चाेरट्यांनी ५० ते ५५ हजार रुपयांचे दागिने लांबवले. हा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस अाला.
संभाजीनगरात अॅड.श्यामसुंदर हरी सपकाळे हे मालाड मुुंबई येथे शिक्षण घेत असलेला भाऊ शंतनू यांच्याकडे कुटुंबीयांसह गेले हाेते. त्यांचे घर कुलूपबंद हाेते. गुरुवारी रात्री सपकाळे कुटुंबीय जळगाव येथे परतले. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील वस्तू व कपडे अस्ताव्यस्त फेकण्यात अालेले हाेते. याबाबत त्यांनी रामानंदनगर पाेलिसांना कळवले. शुक्रवारी सकाळी रामानंदनगर पाेलिस घटनास्थळी गेले हाेते. चाेरट्यांनी कपाटातील ५० ते ५५ हजार रुपयांचे दागिने चाेरून नेल्याची माहिती मिळाली. याबाबत रामानंदनगर पाेलिसांना विचारले असता दागिने सपकाळे यांच्या घरातच मिळालेले अाहेत. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात अालेला नव्हता.