लोह आपल्या आरोग्यासाठी आवश्यक का आहे?

0

लोह (आयर्न) कमी असण्याची लक्षणे म्हणजे थकवा येणे, चक्कर येणे, चेहऱ्याचा रंग फिकट पडणे, काम करण्याची गती कमी होणे, हाता-पायांना मुंग्या येणे, डोके दुखणे. लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे आणि गूळ खावा. जास्त चहा पिऊ नये, कारण चहा आणि कॉफीमुळे ४० ते ६० टक्के आयर्नचे शोषण शरीरात कमी होते. खजूर, बदाम, बेदाणे यांचे लाडू खावेत.

मेंदूच्या रक्तप्रवाहात २० टक्के ऑक्सिजनची गरज असते. ते पोहोचविण्याचे काम आयर्न म्हणजे लोह करते त्यामुळे लोहाचे प्रमाण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

लोहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीसुद्धा लोहाची गरज असते. लोहामुळे शरीराला एनर्जी मिळते. आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य असेल तर आपल्याला सर्दी-खोकला होत नाही. लोहामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. लोहामुळे थकवा येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.