लोहाऱ्यात ठीक-ठिकाणी शिवजयंती साजरी

0

लोहारा ता.पाचोरा :-येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुळजाई रसवंती चे मालक निलेश श्रावण चौधरी यांनी सर्व सहमित्रांना सोबत घेऊन साधेपणाने साजरी केली. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पत्रकार ज्ञानेश्वर(नाना) राजपूत यांचे हस्ते पूजन व माल्यार्पण करून श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून एकमुखाने शिवाजी महाराज की जय!असा नारा देण्यात आला.

यावेळी श्रावण काका चौधरी, अमोल शिंदे, माधान खाटीक, नाना पाटील, संजय चौधरी, दत्तू माळी, नाना चौधरी, भजेबुवा चौधरी, कैलास माळी, कैलास चौधरी, सुकलाल भिल, कौतिक शिंदे, संदिप शिंदे यांसह आदी ग्रामस्थ हजर होते.

श्रीमती दमोताबाई सुर्वे वाचनालय -:- येथील श्रीमती दमोताबाई सुर्वे वाचनालयातही अतिशय साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.बापू विनायक पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पत्रकार कृष्णराव शेळके,ईश्वर देशमुख,सुरेश चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर(नाना) राजपूत,ईश्वर खरे,दिलीप चौधरी वाचनालयाचे अर्जुन पाटील,भानुदास लोहार,शिवचरण राऊत,श्रीराम कलाल यांसह कैलास मिस्तरी,शिवराम भडके,बाविस्कर पोस्टमन,वाचनालयाचे व्यवस्थापक दीपक ओतारी,विकास भोई,गणेश कोळी,ईश्वर भोलाणे,रामदास भोई,छोटू चौधरी यांसह वाचनाचा लाभ घेणारे तरुण वर्ग,वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंडित महाविद्यालय -:- येथील डॉ.जे .जी.पंडित महाविद्यालयात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती उत्सव अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक डी.एम.गरुड हे होते विद्यालयात उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करण्यात आली इतिहासाचे ज्ञान घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनीही शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.तसेच मुख्याध्यापक एस.बी.निकम व उपशिक्षक डी. एम.गरूड यांनीही शिवाजी महाराजांविषयी उजाळा दिला येथील कवी म्हणून संबोधले जाणारे शिक्षक पि.यू.खरे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर उपस्थित विद्यार्थ्यांना गीत गायन करून वाह वा! मिळवली जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक शिरापुरे व आभार पी.एम.सुर्वे यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.