लोहारी जवळ कापसाने भरलेल्या भरधाव ट्रकने ६ वर्षाच्या बालिकेस चिरडले

0
– सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर घडली घटना
 पाचोरा  प्रतिनिधी
 लोहारी बु” ता. पाचोरा गावाजवळुन सुमारे एक कि.मी. अंतरावर असलेल्या इंदिरानगर भागाजवळ सहा वर्षाची बालिका रस्ता ओलांडत असतांना वरखेडी कडुन गुजराथ येथे कापसाच्या भरलेल्या भरधाव ट्रकने बालिकेस चिरडल्याने बालिका जागेवरच ठार झाली. ट्रकची पाच चाके अंगावरुन गेल्याने बालिकेचा आतड्याचा कोथडा बाहेर आला होता. संत्तप्त झालेल्या जमावाने कापसाचा ट्रक पेटवुन देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे तातडीने घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात अपघाताचा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
     दि. १८ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास इंदिरानगर (लोहारी) येथील रहिवासी असलेली प्रतिज्ञा (खुशी) गोकुळ भिल वय – ६  ही बालिका तिची काकु सुरेखा कडुबा भिल यांच्या सोबत वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन घरी परतले होते. बस स्थानकावर उतरल्यानंतर प्रतिज्ञा भिल ही रस्ता पार करीत असतांना वरखेडी कडुन कापसाने भरलेला दहा चाकी ट्रक (क्रं. जी.जे. ०२ एक्स – ३२५७) घेऊन अंजार जि. कच्छ भुज येथे भरधाव वेगाने जात असतांना ट्रकचालक जीवाभाई रत्नाभाई रबारी वय – ४३ रा. लाखावरगाव, ता. अंजार, जि. कच्छ भुज याने प्रतिज्ञा हिस जोरदार धडक दिली. व  क्लिनर  साईडचे पुढील चाक व मागील चार चाके प्रतिज्ञा हिच्या अंगांवरुन गेल्याने युवतीच्या पोटातील आतड्याचा पुर्ण कोथळा बाहेर निघाला. रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांनी शरीराचा कोथळा गाठोड्यात बांधुन पाचोरा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्याने दिड ते दोनशे लोकांचा जमाव होवुन सुमारे तासभर गोंधड घातला. पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे टाॅकिंग फोर्सची तुकडी सोबत घेऊन मृत गेल्यानंतर शिताफीने ट्रक पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्याकडे रवाना केला. पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात लावुन चालकास ताब्यात घेतले. मात्र घटनास्थळी अनेक युवकांचा जमाव पोलिस ठाण्यात तासभर गोंधळ घालत होता. पिंपळगाव (हरे.) पोलिसांनी जमावाची समज काढुन त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here