लोहारा –
लोहारा शेंदुर्णी हा चौदा किलोमीटर अंतराचा रस्ता सुरुवातीपासूनच अतिशय व निमुळता व ठीकठिकाणी वळणयुक्त जोखमीचा अशा परिस्थितीत या रस्त्यावर अपघात होईल अशा प्रकारच्या आठ ते दहा ठिकाणी खोल चार्या निर्माण झाल्या आहेत अजून पुन्हा डागडुजी मोहिमेत अल्पप्रमाणात मलमपट्टी झालेल्या काही चार्यासुद्धा दिसून येतात पाईप लाईन टाकण्यासाठी काही शेतकर्यांनी विनापरवाना रस्ता खोदून या चांगल्या रस्त्याची वाट लावून ठेवल्याचे बोलले जाते वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते ही परवानगी घेतल्यानंतरही काम झाल्यानंतर तिथे योग्य प्रमाणात माती टाकुन किंवा योग्यप्रकारे सिमेंट रेतीचा मुलामा देणे बंधनकारक असते मुलामा न दिल्याने या चार्यांचे दुष्परिणाम असे दिसून येत आहेत की या खोदलेल्या चार्या वाहनांनी आता नालीत रूपांतरीत झाल्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने रस्त्यावर खड्ड्यांची मालिका सुरू आहे हा रस्ता दोन तालुक्यांच्या सीमेत असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते असेच होत राहिल्यास लवकरच हा रस्ता शेवटची घटका मोजणार व चांगला रस्ता होण्यासाठी पुन्हा तालुका सीमाभेद वादात प्रतिक्षा करावी लागणार असे संकेत मिळत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना रस्ता खोदणार्या शेतकर्यांवर कारवाईचे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातून होत आहे.