अमळनेर (प्रतिनिधी):- लोण ता.अमळनेर येथील शेतकरी रविंद्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा (वय-५५) हे आज ता. ८रोजी रात्रीचा विजपुरवठा असल्याने पहाटे ४.३० वाजता ठिबक सिंचनच्या साहय्याने लावलेल्या कापसाला पाणी देण्यासाठी गेले असता सकाळी ७.३० वाजेपर्यतच विजपुरवठा असल्याने सकाळी १०.३० वाजले तरीही उशीरापर्यंत आले नसल्याने परिवारातील सदस्य त्यांच्या तपासासाठी गेले असता ते शेतात मृत स्थितीत आढळून आले.
मयत रविंद्र देवराम पाटील उर्फ छोटू अण्णा यांचा आणि शेजारील शेतकऱ्याचा शेताचा रस्त्यावरुन गेल्या दीड ते दोन महिन्यापासुन वाद चालू होता. कुटुंबियांनी घातपातचा संशय व्यक्त केल्याने आधी संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही म्हणत मागणीवर ठाम होते शेवटी पोलिसांनी पाच संशयितांना अधिक चौकशी साठी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला ,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ भेट देऊन परिवाराला समज देत संशयिताची कसुन चौकशी सुरु आहे. दरम्यान अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात प्रेत शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच नेमके काय ते कळणार असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाने
घटनेचा तपास वैभव पेठकर हे करीत आहेत , प्रथमदर्शनी खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपास व कार्यवाही केली जाईल असे तपासी पोलीस उपनिरीक्षक पेठकर यांनी सांगितले. संशयिताची कसुन चौकशी सुरु आहे.