लोण-पिराचे ग्रा.पं.च्या सरपंचपदी विठाबाई पाटील तर उपसरपंच पदी दिगंबर खवले

0

कजगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोणपिराचे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विठाबाई शिवराम पाटील तर उप सरपंच पदी दिगंबर मारोती खवले यांची बिनविरोध निवड झाली. युवा परीवर्तन पॅनलच्या 7 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.

लोणपिराचे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दुपार पर्यन्त  ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एम.आय.खान सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत  निवडीची घोषणा करण्यात आली. सभेला युवा परीवर्तन पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य- प्रमिलाबाई पंडीत माळी, विठाबाई शिवराम पाटील, जिभाऊ अर्जुन पाटील, अशोक रामभाऊ पाटील, सुनंदा गिरधर पाटील, दिगंबर मारोती खवले आणि कविता सुदाम पवार  उपस्थित होते. तर ग्रामविकास अधिकारी- धनराज आणा पाटील ,लिपिक-राहुल पंडीतराव देसले यांनी काम पाहीले. निवड घोषित झाल्यानंतर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच विठाबाई पाटील व उपसरपंच मारोती खवले. यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पंडित महादू माळी, सुदाम शिवराम पवार, शिवराम नारायण पाटील,गिरधर फकिरा पाटील,इतर ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान निवड झाल्यानंतर युवा परीवर्तन पॅनलने निवडणूकीच्या वेळी त्या अनुशंगाने गावाचा विकास करू असे नवनिर्वाचित सरपंच  व उपसरपंच यांनी यावेळी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.