पारोळा | प्रतिनिधी
येथील मेस्को मातानगरातील प्रभाकर नारायण पाटील यांच्या घराजवळील परिसरात लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्द्ेशिय संस्था जळगावच्यावतीने समाजातील 10 वी, 12वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
हा गुणगौरव सोहळा आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी कॉलेजचे एच.ओ.डी. प्रा. रफिक शेख होते. तर प्रमुखपाहुणे म्हणून नगरसेवक सुनिल वामनराव खडके, बी.टी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थितांच्या हस्ते ट्रॉफी, भेटवस्तू , प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी चिंचपुरे येथील शिक्षक विकास पाटील यांचा आदर्शशिक्षक म्हणून व येथीलच विद्यार्थी मंगेश राजेंद्र पाटील हा उमवित च.षरीा मध्ये पहिला आल्याबद्द्ल आ. राजूमामा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी समाजनेते बी.टी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाजातील विद्यार्थ्यांनी युपीसी व एमपीसी स्पर्धा परिक्षेकडे वाटचाल करावी, असे आवाहन आपल्या मनोगतातून आ. भोळे यांनी व्यक्त करून सर्व विध्यार्थ्यांनी स्वत:ला गरीब न समजता दर्जेदार उच्च शिक्षण घेऊन ज्ञान संपदा प्राप्त करावी, समाजाचे नाव मोठे करावे, भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन आबासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुषार पाटील,ईश्वर पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश विक्रम पाटील, गणेश उत्तम पाटील,प्रभाकर पाटील, अनिकेत पाटील, डिगंबर पाटील यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.