Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले ; हुतात्मा एक्स्प्रेस रद्द
    ताज्या बातम्या

    लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले ; हुतात्मा एक्स्प्रेस रद्द

    By July 1, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :- मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे ५ ते ६ डबे घसरल्याची घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास जामरुंग रेल्वे स्थानकाजवळ घडली. दरम्यान, पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. कर्जत ते लोणावळा दरम्यान असलेल्या छोट्या स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे.

    या गाड्या झाल्या रद्द
    या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर कोयान एक्स्प्रेसही मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आली आहे.

    लांब पल्ल्याच्या मुंबईहून पुणेमार्गे जाणाऱ्या ट्रेन्स या इगतपुरी मार्गे वळवण्यात आल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे. मालगाडीचे ५ ते ६ डबे घसरल्याचीही माहिती समोर आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif