लोणवाडीत बिबट्याचा हल्ल्याने शेतकरी जखमी

0

भुसावळ :- जामठी तालुक्यातील लोणवाडी येथील शेतकरी पुना प्रभाकर राऊत (43)व त्यांच्या पत्नी रेखा राऊत हे बुधवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून घराकडे परतत असतांना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात पुना राऊत हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्या असून या घटनेनंतर तत्काळ त्यांना इतर शेतकर्यांनी प्राथमिक उपचारासाठी जामठी येथील खाजगी दवाखान्यात हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यानंतर शेतकरी व गावक-यां मध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

लोणवाडी परीसरात सुमारे सहा महिन्यांपूर्वी काही शेतकर्यांनी बिबट्या पाहिला होता. त्यावेळी वन अधिकारी यांना पाचारण करण्यात आले होते मात्र तेथूनही बिबट्याने धूम ठोकत पोबारा केला होता. त्यानंतर बुधवारी घडलेल्या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील दुष्काळी परीस्थितीमुळे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले असून पाण्याच्या शोधात बिबट्या आला असावा व त्याने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वन विभागाने अप्रिय घटनेपूर्वी दखल घेवून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.