लोक लाईव्ह आयोजित विश्वस्तरीय ऑनलाईन घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धा – २०२१

लोकशाही समूहाच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे या वर्षी घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोनासारख्या महामारीमुळे प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यामुळे आपण घरोघरी जावून गणेशाचे दर्शन घेवू शकत नाही. म्हणून मागील वर्षा प्रमाणे लोकशाही समूहाच्या लोक लाईव्हने विश्वस्तरीय ऑनलाईन घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धा – २०२१ आयोजन केले आहे.

https://youtu.be/yJu5JBGrGPA

मागील वर्षी लोक आरास स्पर्धेला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. जळगावचं नाही तर विश्व स्तरावरून देखील या स्पर्धेत अनेकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तर यावर्षी सुद्धा आपण ऑनलाईन घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धा – २०२१ मध्ये सहभागी होवून जिंकू शकतात.. आकर्षक बक्षिसे आणि सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक ई-प्रमाणपत्र. तसेच येणार्‍या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटींना पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल.

स्पर्धेच्या अटी

घरात गणपती भोवती केलेल्या सजावटीचा दोन मिनिटांचा एक व्हिडीओ आणि दोन फोटो एक गणपती च्या मूर्तीचा आणि दुसरा आरती करतानाचा असे दोन फोटो आमच्याकडे पाठवायचे आहे.

अशाप्रकारे सहभाग नोंदवावा

स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून फॉर्म भरावा आणि सोबत व्हिडीओ व फोटो पाठवा

👇🏼

https://forms.gle/53SYCQLAmrbjcpyi6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here