लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिड हजार विद्यार्थ्यांची दांडी

0

जळगांव-
राज्य लोकसेवा आयोगाच्या पुर्वपरीक्षेस आज 24 रोजी 9 हजार 550 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यापैकी 8हजार 94 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते तर एक हजार चारशे छप्पन्न विद्याथ्यार्ंनी दांडी मारली.
शहरात आज मु.जे., देवकर, रायसोनी अभियांत्रीकी, श्रमसाधनासह शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालय असे सुमारे 30 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पुर्व परीक्षा 2019 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हयाभरातुन अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. महामार्गावर झालेल्या अपघातामुळे झालेली वाहनांची कोंडी तसेच मध्य रेल्वेची 11039 डाउन महाराष्ट्र एक्सप्रेस देखिल सुमारे एक तास उशीराने जळगांवात पोहचल्याने अनेक परीक्षार्थींना वेळेवर पोचता आले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षार्थींची परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी धावपळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.