Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !
    जळगाव

    लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

    By April 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव / पाळधी :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली आहे. आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत  व सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश दिलेत.

    सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असून रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विनंती नुसार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले.२-३ दिवसात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

    या कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असतील. यासोबत येथे १५ ऑक्सीजन बेड आणि ५ मिनी व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रूग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा हे संयुक्तरित्या उचलणार आहेत. अर्थात, हे कोविड केअर सेंटर लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार हे सेंटर उभारण्यात येत आहे.

    दरम्यान, आज पाळधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, गोपाल कासट,  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. नरेश पाटील, डॉ.सी.एस.पाटील, ग्राम पंचायत सदस्य अरविंद मानकरी, मच्छीन्द्र साळुंके, गुलाब भाऊ फाउंडेशनचे व सुगोकीचे पदाधिकारी , आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif