लोहितपुर :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवातही झालीय. इंडो-तिबेट पोलीस दलाच्या (ITBP) ८० जवानांनी आज अरुणाचल प्रदेशातील लोहितपूरमध्ये अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमधील मतदान केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केलं.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला हक्क आयटीबीपीचे डीआयजी (एटीएस) सुधाकर नटराजन यांनी बजावल्याची माहिती आयटीबीपीच्या प्रवक्त्यांनी दिली. अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आयटीबीपीच्या दुसऱ्या युनिटमधील जवानही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोस्टल बॅलेट २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठवण्यात येतील.