लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमुळे विद्यापीठ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

0
जळगांव | प्रतिनिधी 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या विविध विद्याशांखांच्या पदवी परीक्षांना 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. परंतु लोकसभेच्या निवडणूका घोषित झाल्याने विद्यापिठ कार्यक्षेत्रात 23 आणि 29 रोजी मतदान प्रक्रिया होत असल्याने परीक्षा पेपरच्या  तारखेत बदल करण्याचा परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक  यापुर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार कला, विज्ञान आणि वाणिज्य शांखांच्या पदवी परीक्षा 26 मार्च पासून सुरू होणार आहे. मात्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विद्यापिठ कार्यक्षेत्रात जळगांव, धुळे आणि नंदुरबार जिल्हयात 23 आणि 29 मार्च रोजी लोकसभा मतदान प्रकिया पार पडणार  आहेत. त्यामुळे 23 मार्च आणि 29 मार्च रोजी घेण्यात येणार्‍या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा अंतिम करण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक कुलगुरू डॉ. पी.पी पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे सदस्य यांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.