लोकसभा निवडणुकीत नवमतदारांच्या हाती निकालाचे भवितव्य

0

मतदारसंघांतील नवमतदारांची संख्या ही गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्त

जळगाव. दि.5 –
सन 1997 ते 2001 दरम्यान जन्म झालेले युवक युवती नवमतदार गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानास पात्र नव्हते. यावर्षी जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात सरासरी 54 हजार 505 मतदार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीत मतदान करण्यास पात्र राहणार आहेत.त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत नियमित मतदारांसोबतच नवमतदारांच्या हाती निकालाचे भवितव्य अवलंबून रहाणार आहे.
नवमतदारांची हि संख्या 2014 साली जिल्ह्यातील दोन जागांवरील मताधिक्यापेक्षा जास्त आहे. अर्थात यापैकी काही मतदारांना 2014 नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची संधी मिळाली आहे. मात्र लोकसभेसाठी ते पहिल्यांदाच मतदान करतील. देशातील विभागीय राजकारणाचे महत्त्व पाहता गेल्या सरासरीत जे प्रथम मतदार आहेत (18 ते 22 वयोगट) त्यांची तुलना करता येईल. त्यानुसार याचा तपशिल पहाता जिल्हयासह संपूर्ण देशभरात किमान 282 मतदारसंघांत या नवमतदारांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या बहुमताच्या आकडयापेक्षाही ती जास्त आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट झालेल्यांच्या आधारे हे विश्लेषण आहे.
या 12 मोठया राज्यांतील आहेत. त्यात पश्चिम बंगाल 32 जागा, बिहार 29, उत्तर प्रदेश 24, कर्नाटक व तमिळनाडू प्रत्येकी 20, राजस्थान व केरळ प्रत्येकी 17, झारखंड 13, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश प्रत्येकी 12, मध्य प्रदेश 11 तसेच आसाम 10 जागा ही काही महत्त्वाची राज्ये आहेत. या सर्व राज्यांमध्ये या जागा पाहता जे नवमतदार आहेत त्यांची संख्या गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे.
गत सन 2014 मध काँगे्रस, राष्ट्रवादी, भााजपा, शिवसेनेसह प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. तर यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेना युती व आघाडी झाली आहे. काही ठिकाणी उमेदवार देण्याचा तिढा सोडता सर्वच ठिकाणी युती आघाडी झालेली आहे. त्यामुळे आता नवमतदारांच्या हाती राजकीय पक्षांचे भवितव्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जिल्हयात एकुण लोकसंख्येपैकी 34 लाख 05 हजार 628 मतदार आहेत. यात 17 लाख 79 हजार 027 पुरूष तर 16 लाख 26 हजार 156 महिला मतदार आहेत. तसेच 85 इतर मतदार असून सन स.2014 नंतर ते आजपर्यतच्या विविध ठिकाणी नोदणीनुसार 54 हजार 505 नविन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यात 18 ते 20 वयोगटातील मतदारांची नोदणी झालेली आहे.
– तुकाराम हुलवळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी

 

Leave A Reply

Your email address will not be published.