लोकसभा निवडणुकीची मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या चाळीसगाव येथील गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी-

0

चाळीसगाव ;- सन 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वजनिक निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यासाठी चाळीसगाव येथील शासकीय गोदामाची जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किशोर चव्हाण, तहसिलचे निकुंभ उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सुस्थितीत रहावी यासाठी गोदामाची स्वच्छता, विद्युत पुरवठा, एक्झॉक्ट फॅन लावणे, यंत्रे ठेवल्यानंतर गोदामाची दारे बंद करणे, गोदामाच्या परिसरातील जागेचे सपाटीकरण, मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी 24 तास पहारा देणाऱे पोलीस, गार्ड यांची निवास व्यवस्था, आरामकक्ष, टॉयलेट-स्वच्छता गृह यांची व्यवस्था याबाबत उपस्थितांना सुचना दिल्यात.

निवडणूक आयोगाने सन 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वजनिक निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त जागेची निवड करण्याचे निर्देश दिले आहे. लोकसभा सार्वजनिक निवडणूकीत जळगाव मतदार संघासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बेंगलोर येथून प्राप्त होणार आहेत. ही इलेक्ट्रॉनिक यंत्रे चाळीसगाव येथील गोडावून मध्ये ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चाळीसगाव येथील शासकीय गोदामाची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.