फैजपूर प्रतिनिधी: दैनिक लोकशाही दिवाळी अंकाचे प्रकाशन फैजपूर येथे उत्साहत करण्यात आले. येथील सतपंथ मंदिरात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच यावेळी उपनगराध्यक्षा सौ.नयना चंद्रशेखर चौधरी,नगरसेवक तथा कृउबा माजी सभापती केतन किरंगे,शुभम टेक्सटाइल संचालक सुनिल वाढे मामाजी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले,युनियन बँक मित्र आसिफ तडवी,भिमा भोई इ.उपस्थीत होते.दैनिक लोकशाही निष्पक्षपणे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून वृत्तपत्रासोबतच दिवाळी अंक देखील नेहमीच वाचनीय असतो असे कौतुकास्पद प्रतिपादन दैनिक लोकशाही विषयी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले.सुत्रसंचल मुख्याध्यापक गणेश गुरव सर यांनी तर आभार प्रदर्शन फारुक शेख यांनी केले.
त्याचप्रमाणे दिपाली गृप्स कार्यालय फैजपूर याठिकाणी दैनिक लोकशाही दिवाळी अंकाचे खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख,प्रा.ललितकुमार फिरके सर, मुख्याध्यापक गणेश गुरव सर, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, समाजसेवक अशोक भालेराव,डाटा झोन संचालक बंटी भाऊ आंबेकर, चैतन्य वाघुळदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.फैजपूर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक लोकशाही दिवाळी अंकाला दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या यामध्ये स्वामिनारायण गुरुकुल चे उपाध्यक्ष भक्तीकिशोरदास महाराज, प्रांताधिकारी कैलास कडलग साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी देविदास पिंगळे साहेब, फैजपूर न.प.मुख्याधिकारी किशोर चव्हाण साहेब, फैजपूर पो.स्टे.उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब, आशियाना कंस्ट्रक्शन संचालक राजू हाजी नवाब तडवी, कॉंग्रेसचे गटनेते कलीम खान मण्यार,भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, राष्ट्रवादी गटनेते कुर्बान शेख,मा.नगराध्यक्षा सौ.अनिता चौधरी,दुध संघ संचालक हेमराज चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मलक शरीफ सर,एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान शेख इकबाल,रईस मोमीन इ.मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा देऊन अभिनंदन व कौतुक केले.