Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा- जिल्हाधिकारी राऊत
    ताज्या बातम्या

    लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा- जिल्हाधिकारी राऊत

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 4, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास अवगत करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

    नागरीकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावे, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, याकरीता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकपाच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरीक त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक व्हावी याकरीता येत असतात. त्यामुळे प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी कोणत्याही विभागाकडे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व विभागप्रमुखांना दिल्यात. त्याचबरोबर नागरीकांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे तसेच आस्थापनाविषयक बाबी लोकशाही दिनात दाखल करु नये असे आवाहन केले.

    आजच्या लोकशाही दिनी प्राप्त झाले बाविस तक्रार अर्ज

    आज झालेल्या लोकशाही दिनात जळगाव तहसील कार्यालयाकडे आठ अर्ज प्राप्त झाले तर जामनेर तहसील कार्यालयाकडे दहा, यावल, भडगाव तहसील कार्यालयाकडे प्रत्येकी एक अर्ज प्राप्त, चाळीसगाव तहसील कार्यालयाकडे दोन याप्रमाणे एकूण 22 तक्रार अर्ज प्राप्त झाले. बैठकीत या अर्जावर चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच मागील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif